मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स सध्या खूप चर्चेत आहे. डिव्हिलियर्स अलीकडेच बंगळुरूमध्ये आरसीबीच्या व्यवस्थापनाला भेट देण्यासाठी आणि आयपीएल २०२३च्या लिलावापूर्वी संघासोबत त्याच्या भविष्याबाबत भाष्य करण्यासाठी आला होता. यावेळी डिव्हिलियर्सने क्रिकेटचा देव भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची देखील भेट घेतली.
या सगळ्याच्या दरम्यान एबी डिव्हिलियर्सचेमुंबईतील त्याच्या चाहत्यांसोबत गल्ली क्रिकेट खेळतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डिव्हिलियर्सने गल्ली क्रिकेट खेळून चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. "एबी डिव्हिलियर्स मुंबईतील महालक्ष्मी येथे चाहत्यांसह रस्त्यावर क्रिकेट खेळत आहे", अशी माहिती एका ट्विटर युजरने दिली. व्हिडीओमध्ये एबी डिव्हिलियर्सने टी-शर्ट, शॉर्ट्स परिधान केले आहे. चाहत्यांनी डिव्हिलियर्सला घेरलेले असता तो अचूकपणे चेंडू मारण्यापूर्वी शॉटचा सराव करताना दिसतो आहे.
डिव्हिलियर्सने खेळले गल्ली क्रिकेटचार वेगवेगळ्या व्हिडींओमध्ये मिस्टर ३६० वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहे. मिस्टर ३६० यष्टीरक्षक आणि फलंदाजी करत आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हातात चेंडू घेऊन गोलंदाजीच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मी विराट कोहलीच्या चाहत्यासोबत खेळत असल्याचे यावेळी डिव्हिलियर्सची व्हिडीओ शेअर करणाऱ्याने म्हटले. डिव्हिलियर्सचे व्हिडीओ पाहून चाहते त्याच्यावर कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कोणीही त्याचा द्वेष देत नाही असा क्रिकेटर म्हणून चाहत्यांनी डिव्हिलियर्सला संबोधले आहे. "ईडन गार्डन्स, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि लॉर्ड्स येथे खेळणारा माणूस, भारतात गल्ली क्रिकेट खेळतो. तो आमचा एबीडी व्यतिरिक्त कोणीही असू शकत नाही", असे एका चाहत्याने म्हटले.
डिव्हिलियर्सने जाणून घेतला क्रिकेटप्रेमींचा कलविश्वचषकात आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. मात्र या सामन्यापूर्वी डिव्हिलियर्सने भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत भिडतील असे म्हटले होते. त्याने ट्विटच्या माध्यमातून विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार का याची चाचपणी केली. यासाठी मिस्टर ३६०ने क्रिकेटप्रेमींचा कल घेतला यामध्ये ७५ टक्के लोकांनी भारत-पाकिस्तान यांच्यात फायनलचा सामना होणार असल्याचे म्हटले. क्रिकेटप्रेमींचा कल पाहिल्यावर डिव्हिलियर्सने आणखी एक ट्विट केले. "फँटसी फायनल खरंच! आतापर्यंत ७०% लोकांनी भारत-पाकिस्तान फायनल होणार असे मत दिले, परंतु मला खात्री आहे की NZ आणि ENGला त्याबद्दल काहीतरी सांगायचे असेल. दोन्ही संघांमध्ये शानदार खेळाडूंची फळी आहे आणि ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोन सेमीफायनल लढती होणार आहेत. माझे देखील मत भारत-पाकिस्तान फायनलला जाते." अशा आशयाचे ट्विट करून डिव्हिलियर्सने भारत-पाकिस्तान यांच्यात फायनलचा सामना झाला आणखी थरार रंगेल असे म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"