IPL 2022: गुजरात टायटन्सकडून गेल्या सामन्यात ९६ धावांची दमदार खेळी करणारा शुबमन गिल आजच्या सामन्यात स्वस्तात माघारी परतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला शुबमन गिल त्याच्या पद्धतीने फटकेबाजीच्या तयारीत असतानाच फिल्डरने त्याचा भन्नाट झेल टिपला. पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारने १७ धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकात त्याला सूर गवसला. त्याच षटकात त्याने टाकलेला चेंडू गिलने मारला. वेगाने चेंडू जात असतानाच राहुल त्रिपाठीने हवेत झेप घेत अफलातून झेल टिपला आणि संघाला पहिलं यश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. पाहा कॅचचा व्हिडीओ-
दरम्यान, हैदराबादच्या केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने पहिलं षटक अतिशय वाईट टाकलं. या षटकात दोन वेळा वाईड चेंडूवर चौकार गेल्याने १० अतिरिक्त धावा संघाला सुरूवातीलाच मिळाल्या. पण पुढच्या षटकात भुवनेश्वरने चांगलं कमबॅक करत विकेट घेतली.
गुजरात टायटन्स संघ: मॅथ्यू वेड (किपर), शुभमन गिल, साई एस, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
सनरायझर्स हैदराबाद संघ: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (डब्ल्यू), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन