Shivam Mavi, IND vs SL Video: स्विंगम.... काहीही कळण्याआधीच नवख्या शिवम मावीने उडवला फलंदाजाचा त्रिफळा

चेंडू नक्की कसा गेला ते न समजल्याने निसांकाही नंतर काही वेळ स्टंपकडे बघतच बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:57 PM2023-01-03T21:57:54+5:302023-01-03T21:58:33+5:30

whatsapp join usJoin us
Video of Shivam Mavi clean bowled Nissanka on very first over of Debut T20 IND vs SL watch viral | Shivam Mavi, IND vs SL Video: स्विंगम.... काहीही कळण्याआधीच नवख्या शिवम मावीने उडवला फलंदाजाचा त्रिफळा

Shivam Mavi, IND vs SL Video: स्विंगम.... काहीही कळण्याआधीच नवख्या शिवम मावीने उडवला फलंदाजाचा त्रिफळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shivam Mavi, IND vs SL Video: श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वानखेडे स्टेडियमवर भेदक गोलंदाजी करत भारताच्या धावांवर अंकुश लावला. एकेवेळी १८० पार जाऊ शकेल अशा भारतीय डावाला मधल्या टप्प्यात श्रीलंकेकडून चांगलीच झुंज मिळाली. इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी चांगला खेळ करताना ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. अखेरच्या टप्प्यात दीपक हुडाने फटकेबाजी करत भारताला १६०पार नेले. त्याला अक्षर पटेलची चांगली साथ मिळाली. पण सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो पदार्पणवीर शिवम मावी याने उडवलेला फलंदाजाचा त्रिफळा.

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात आज शुभमन गिल व शिवम मावी या दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.  भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरूवात अर्शदीप सिंग करण्याची शक्यता होती. पण, तो आजारपणातून बरा झाला नसल्याने पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले. त्यामुळे मावीला संधी मिळाली. शिवम मावीने संधीचं सोनं करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आपल्या पहिल्या आणि डावाच्या दुसऱ्याच षटकात त्याने गोलंदाजीची जादू दाखवली. शिवम मावीने पाचवा चेंडू इन स्विंग केला. श्रीलंकेच्या निसांकाला चेंडू कळलाच नाही, त्यामुळे चेंडू थेट स्टंपवर आदळला नि तो क्लीन बोल्ड झाला. चेंडू नक्की कसा गेला ते न समजल्याने निसांकाही नंतर काही वेळ स्टंपकडे बघतच बसला.

दरम्यान, बांगलादेश दौऱ्यावर द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनने पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या. पदार्पणवीर गिलने दुसऱ्या षटकात चौकाराने खाते उघडले. तिसऱ्या षटकात महीष थिक्सानाला गोलंदाजीला आणले आणि त्याने गिलला ७ धावांवर LBW केले. चमिका करुणारत्नेने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवला ( ७) माघारी पाठवले. स्कूप मारण्याचा सूर्याचा प्रयत्न फसला अन् वानखेडेवर सन्नाटा पसरला. भारताला पॉवर प्लेमध्ये २ बाद ४१ धावा करता आल्या.

त्यानंतर संजू सॅमसन ५ धावांवर बाद झाला. इशानने ३७ धावा (३ चौकार व २ षटकार) केल्या. हार्दिक २९ धावांवर बाद झाला. दीपक हुडाने मात्र मैदान गाजवले. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. 

Web Title: Video of Shivam Mavi clean bowled Nissanka on very first over of Debut T20 IND vs SL watch viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.