Trent Boult Video, IPL 2022 KKR vs RR Live: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करूनही राजस्थानच्या संघाने २० षटकात ५ बाद १५२ धावा केल्या. राजस्थानला कर्णधार संजू सॅमसनच्या अर्धशतकाने मोठी मजल मारण्यास मदत झाली. तसेच शेवटच्या टप्प्यात शिमरॉन हेटमायरने नाबाद २७ धावा कुटत संघाला १५० पार मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावात एक विचित्र आणि मजेशीर गोष्ट घडली.
डावाच्या तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू ट्रेंट बोल्टने टाकला. चेंडू मारल्यानंतर तो वेगाने फिल्डरकडे गेला. आधीच्याच षटकात प्रसिध कृष्णाने गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच्या ऊर्जेचा संचार काहीसा जास्तच दिसून आला. चेंडू त्याच्याकडे जाताच त्याने जोरात चेंडू स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला. अतिऊत्हासाच्या भरात त्याने ट्रेंट बोल्टलाच चेंडू मारला. ट्रेंट बोल्टने चेंडू चुकवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पायाला चेंडू लागला व तो जमिनीवर पडला. सुदैवाने त्याला फारशी दुखापत झाली नाही. त्यामुळे त्याने पुढेही चांगली गोलंदाजी केली. पाहा व्हिडीओ-
तत्पूर्वी, KKR ने राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी दिली. देवदत्त पडिक्कल २ धावांतच बाद झाला. पाठोपाठ जोस बटलरदेखील २५ चेंडूत २२ धावांची खेळी करून माघारी परतला. पण संजू सॅमसनने फटकेबाजी केली. त्याने ४९ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ७ चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. करूण नायर (१३) आणि रियान पराग (१९) या दोघांना मोठी धावसंख्या उभारणं जमलं नाही. पण शिमरॉन हेटमायरने फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्याने १३ चेंडूत २७ धावा केल्या. त्यात १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. कोलकाता नाईट रायडर्स कडून टीम सौदीने सर्वाधिक २ बळी टिपले.
Web Title: Video of Trent Boult hit rocket throw by Prasidh Krishna Ipl 2022 KKR vs RR Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.