कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 382,366 इतका झाला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या ही 102,505 इतकी आहे, पण 16,568 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, युरोपियन चॅम्पियन्स ली, युरो लीग, सीरि ए इटालियन लीग आदी महत्त्वाच्या फुटबॉल लीगसह इंग्लिश प्रीमिअऱ लीग ( आयपीएल) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू घरीच थांबले आहेत. जे खेळाडू पदरेशातून प्रवास करून घरी परतले आहेत, त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वतःला 14 दिवसांसाठी आयसोलेशन केले आहे. म्हणजेच घरी असूनही त्यांना कुटुंबीयांच्या कोणत्याही सदस्यांना भेटता येत नाहीत.
बांगलादेशचा माजी कर्णधार आणि जगातला अव्वल अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन नुकताच आपल्या कुटुंबीयांकडे म्हणजेच अमेरिकेला परतला आहे. पण, त्यानं स्वतःला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं आहे. तो एकाच शहरात आहे, परंतु त्याला कुटुंबीयांना भेटता येत नाही. त्यामुळे शकिब भावुक झाला आहे. त्याला लहान मुलगी आहे, पण, तिलाही तो पाहू शकत नाही. त्यामुळे भावनिक शकिबनं फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे आणि त्यात त्यानं आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.
तो म्हणाला,''काही दिवसांपूर्वी मी अमेरिकेला परतलो आहे आणि विमानात असताना मी खुप चिंतेत होतो. पण, प्रवासात मी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मानसिक स्थिती ढासळू दिली नाही. अमेरिकेला पोहोचल्यावर मी थेट हॉटेलमध्ये गेला. मी येथेच काही दिवस राहाणार असल्याचे पत्नी व मुलीला कळवले.''
''अमेरिकेला येत असताना आपण व्हायरस तर सोबत घेऊन जात नाही ना, ही भीती सतत मनाला सतावत होती. त्यामुळे मी स्वतःला आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यापासून मी माझ्या मुलीलाही पाहिलेले नाही. मी तिला पाहू शकत नाही, ही गोष्ट मनाला टोचणारी आहे. पण, या घडीला त्याग करणं महत्त्वाचं आहे,''असेही त्यानं स्पष्ट केलं.
पाहा व्हिडीओ...
जगभरातील सर्व सरकारने लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी शकिब हॉटेलमध्ये आयसोलेशन झाला आहे. ''जे परदेशात राहतात त्यांनी घरीच थांबावे आणि लोकांना भेटणे टाळावे. नातेवाईक किंवा शेजारी यांनाही आपल्याकडे येऊ देऊ नका. पुढील 14 दिवसतरी स्वतःच्या घरीच राहा,'' असा सल्ला त्यानं दिला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...
Coronavirus : आता आयसीसीचेही ‘वर्क फ्रॉम होम’, अनेक कर्मचारी घरुनच करणार काम
इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा स्तुत्य उपक्रम; पबचे बनवले किराणा दुकान, वाचवला अनेकांचा रोजगार
IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाचा पुढाकार; सरकारला कोट्यवधींची मदत
Web Title: Video : Painful that I can't see my daughter: Shakib Al Hasan, in self-isolation, on reaching USA svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.