तामिळनाडू : श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगानं मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला रामराम केला. बांगदालेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर त्यानं निवृत्ती घेतली, तशी घोषणा त्यानं आधीच केली होती. श्रीलंकेनेही त्याला विजयी निरोप दिला. पण, गेली अनेक वर्ष जगभरातील गोलंदाजांना प्रेरित करणाऱ्या मलिंगाची मोहिनी अजूनही कायम आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जी पेरियास्वामी हा देसी मलिंगा भारताला सापडला आहे. सध्या त्याच्याच गोलंदाजीची चर्चा आहे आणि सोमवारी झालेल्या सामन्यात त्याचा यॉर्कर पाहून मलिंगाची आठवण होण्यापासून स्वतःला रोखणं, कोणत्याही क्रिकेटपटूला जमणार नाही. जी पेरियास्वामी हा तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये चेपॉक सुपर गिल्लीजकडून खेळतो.
सोमवारी झालेल्या सामन्यात चेपॉक सुपर गिल्लीज संघाने कोवाई किंग्ज संघावर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कोवाई किंग्जला 9 बाद 115 धावा करता आल्या. शाहरुख खान एम ( 22) आणि अभिनव मुकुंद ( 22) हे सलामीवीर वगळता कोवाईच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. हरिष कुमार एसने 13 धावांत 4 विकेट्स घेतल्या. त्याला पेरियास्वामी ( 2/23) आणि अश्विन एम ( 2/11) यांनी उत्तम साथ दिली. प्रत्युत्तरात गोपिनाथ के एचच्या 82 धावांच्या जोरावर सुपर गिल्लीजनं हा सामना जिंकला. गोपिनाथने 41 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 82 धावा केल्या. गंगा श्रीधरने नाबाद 31 धावा करून त्याला योग्य साथ दिली. पण, या सामन्यात पेरियास्वामीचा यॉर्कर गाजला.
c
Malinga Retires: लसिथ मलिंगानं सांगितलं निवृत्ती मागचं कारण
ढाकाः श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने वन डे कारकिर्दीतून निवृत्ती घेतली. श्रीलंकेने बांगलादेशवर 91 धावांनी विजय मिळवून मलिंगाला विजयी निरोप दिला. या सामन्यात मलिंगाने 38 धावांत 3 विकेट्स घेत भारताचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा वन डेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला. लंगेच्या 314 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 41.4 षटकांत 223 धावांत तंबूत परतला.
सामन्यानंतर मलिंगा म्हणाला,''संपूर्ण कारकिर्दीत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. युवा गोलंदाजही अशीच कामगिरी करतील, अशी आशा आहे. भविष्यात मला हेच अपेक्षित आहे. या युवा गोलंदाजांकडून मॅच विनिंग कामगिरी मला पाहायची आहे. देशासाठी 15 वर्ष खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. 2023च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघबांधणीला आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. युवा खेळाडूंना पुरेसा अनुभव मिळायला हवा.''
Web Title: Video : A perfect tribute to the King of Yorkers; Periyaswamy chanelling his inner Lasith Malinga
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.