बिग बॅश लीगमधील चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे सत्र मंगळवारीही कायम दिसले. मेलबर्न रेनेगॅडेसच्या सॅम हार्पर आणि बीयू वेस्टर यांनी, तर पर्थ स्कॉचर्सच्या लाएम लिव्हिंगस्टोन यांच्या तुफान फटकेबाजीनं क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेलबर्न संघानं 5 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात पर्थ संघाच्या सलामावीरांनी हल्लाबोल केला. राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू लिव्हिंगस्टोननं रावडी षटकार खेचून चेंडू चक्क स्टेडियमबाहेर टोलावला. त्याचा हा फटका सर्वांना अवाक् करून गेला.
प्रथम फलंदाजी करताना मार्कस हॅरिस आणि अॅरोन फिंच यांना समाधानकारक खेळ करता आला नाही. शॉन मार्शला भाऊ मिचेल मार्शनं माघारी पाठवून मेलबर्न संघाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर हार्पर आणि वेस्टर यांनी तुफान फटकेबाजी केली. हार्परनं 46 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 73 धावा केल्या, तर वेस्टरनं 40 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 59 धावा केल्या. पर्थच्या झाय रिचर्डसननं तीन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना लिव्हिंगस्टोन व जोश इंग्लीस यांनी शतकी भागीदारी केली. लिव्हिंगस्टोन 39 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 59 धावांत माघारी परतला. आर ग्लिसननं त्याला माघारी पाठवलं, पण लिव्हिंगस्टोननं टोलावलेला षटकार सर्वांची वाहवाह मिळवून गेला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: Video : Perth Scorchers Liam Livingstone launches one on the roof in BBL09
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.