जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये नंबर १ गोलंदाज आर अश्विनला ( Ravichandran Ashwin ) बाकावर बसण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला. लंडनमध्ये खेळण्याची संधी न मिळालेला आर अश्विन मायदेशात परतला अन् तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये ( TNPL 2023) पहिल्याच सामन्यात दोन विकेट्स घेत चमकला. पण, या कामगिरीपेक्षा सामन्यातील एका प्रसंगामुळे अश्विनने सोशल मीडियावर हवा केलीय. अश्विनच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी फलंदाजाला मैदानावरील अम्पायरने झेलबाद दिले. त्याला आव्हान देत फलंदाजाने तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली... तिसऱ्या अम्पायरने नाबाद निर्णय देताच, अश्विनने DRS घेतला अन् तिसऱ्या अम्पायरची कोंडी केली... DRS वर DRS घेण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच घटना ठरली.
Ba11sy Trichy vs Dindigul Dragons या सामन्यातील १३व्या षटकात हा प्रसंग घडला. ट्रीसी संघाची अवस्था ६ बाद ६९ अशी झाली होती आणि त्यावेळी आर राजकुमार फलंदाजी करत होता. अश्विनने टाकलेल्या गुगलीवर राजकुमार फसला अन् चेंडू त्याच्या बॅट जवळून यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. झेलची जोरदार अपील झाली अन् मैदानावरील अम्पायरने आऊट निर्णय दिला. त्याविरोधात राजकुमारने लगेच DRS घेतला. त्यात चेंडू व बॅट यांच्यात संपर्क न झाल्याचे स्पष्ट झाले. बॅट ग्राऊंडवर आदळल्याने स्पाईक दिसत असल्याचे समोर आले अन् तिसऱ्या अम्पायरने राजकुमारला नाबाद दिले.
पण, मैदानावरील अम्पायरने त्यांचा निर्णय बदलल्याचे संकेत दिल्यानंतर अश्विनसह सर्वांना धक्का बसला. अश्विनने लगेच DRS घेतला. अश्विन स्टम्पिंगसाठी हा DRS घेत असल्याचे समालोचकांना वाटले, परंतु तिसऱ्या अम्पायरने झेलबाद बाबत दिलेला निर्णय अश्विनला पटलेला नव्हता. तिसऱ्या अम्पायरने त्यांचा निर्णय कायम ठेवला, राजकुमारने २२ चेंडूंत नाबाद ३९ धावा करून संघाला १२० धावांपर्यंत पोहोचवले. अश्विनने ४ षटकांत २६ धावा देताना दोन विकेट्स घेतला. ड्रॅगन्सने हा सामना सहा विकेट्स व ३१ चेंडू राखून सहज जिंकला.
सामन्यानंतर अश्विन म्हणाला, या स्पर्धेसाठी DRS नवीन आहे. त्यामुळे तिसरे पंच दुसऱ्या अँगलने ती कॅच पाहतील असे मला वाटले म्हणून मी DRS घेतला.
Web Title: Video : R Ashwin reviews a review in TNPL 2023 clash, says 'I thought they'd see with a different angle'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.