ICC ODI World Cup 2023 PAK vs AFG : अफगाणिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास नोंदवला आणि वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच पाकिस्तानवर विजय मिळवला. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने स्पर्धेत दुसरा धक्कादायक निकाल नोंदवला. पाकिस्तानने दिलेले २८३ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने ४९ षटकात ८ विकेट्स राखून पार केले. विजयानंतर अफगाण संघाच्या खेळाडूंनी मैदान, ड्रेसिंग रूम आणि टीम बसमध्ये जल्लोष केला. टीम बसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू टीम बसमध्ये शाहरुख खानच्या लुंगी डान्स गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
स्टार स्पिनर राशिद खान सर्वात जास्त डान्स करत आहे. सामन्यानंतर राशीदने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणसोबत मैदानावर डान्स केला होता. अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत ५ पैकी २ सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तान संघाने पुढील दोन सामने जिंकल्यास संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. पाकिस्तान संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग अवघड दिसत आहे. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानला दुसरी फेरी गाठता आलेली नाही.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून २८२ धावा केल्या होत्या. बाबर आजमने ७४ धावा आणि अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने ८७, रहमत शाहने नाबाद ७७ आणि रहमानुल्लाह गुरबाजने ६५ धावा केल्या. कर्णधार शाहिदीने नाबाद ४८ धावा केल्या.
पाकिस्तान स्पर्धेतून बादपाकिस्तान संघाला उर्वरित ४ सामन्यांत इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा सामना करायचा आहे आणि हे चारही सामने जिंकले तर त्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण होऊ शकतो.