Join us  

Video: रॅसी व्हॅन डर हुसेन पोझ मारत बसला, मागून स्टंप उडाले; स्टार्कच्या चेंडूने क्रिकेटप्रेमीही चक्रावले!

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 8:54 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ब्रिस्बेनमध्ये खेळला गेलेला सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत ६ गडी राखून जिंकला. कांगारू संघाने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्यानंतर ब्रिस्बेनमधील खेळपट्टीची चर्चा रंगली असतानाच दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज असलेल्या रॅसी व्हॅन डर हुसेनच्या विकेटची देखील चर्चा सुरु आहे. 

स्टार्कने टाकलेल्या भेंदक चेंडूवर रॅसी व्हॅन डर हुसेन क्लीन बोल्ड झाला. रॅसी व्हॅन डर हुसेनने चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. स्टार्कच्या या चेंडूवर रॅसी व्हॅन डर हुसेन डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, त्याने ती पोझही घेतली मात्र रॅसी व्हॅन डर हुसेन पोझ घेण्याच्याआधीच चेंडू स्टंपला आढळला. या विकेट्सची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर क्रिकेटप्रेमी हा चेंडू आर्श्चयकारक असल्याचं बोलत आहे. स्टार्कने रॅरॅसी व्हॅन डर हुसेनला बाद करून त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३००वी विकेट्स मिळवण्यात यश मिळवले.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १५२ धावा केल्या होत्या. यादरम्यान काईल व्हेरेनने ६४ धावांची एकहाती झुंज दिली. यादरम्यान लायन आणि स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी भेदक गोलंदाजी केली. स्टार्कने ३ बळी घेतले. लायनने ३ बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि सर्वबाद होईपर्यंत २१८ धावा केल्या. यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने ९२ धावांची शानदार खेळी केली. त्याने ९६ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला. अॅलेक्स कॅरी २२ धावा करून नाबाद राहिला. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने ४ बळी घेतले. जेन्सनने ९ षटकांत ३२ धावा देत ३ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या ९९ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान संघाचे ४ खेळाडू खातं न उघडताच बाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली.  कमिन्सनं ५ विकेट्स घेतल्या. तर स्टार्क आणि बोलंड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात ४ गडी गमावून ३५ धावा केल्या आणि सामना ६ विकेट्सनी जिंकला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकासोशल मीडिया
Open in App