मुंबई: वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात असल्याची चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सर्व आरोप फेटाळून होते. परंतु काही दिवसांपासून व्हायरल झालेल्या खेळाडूंच्या फोटोमध्ये रोहित शर्मा नसल्याने दोघांमध्ये अजूनही वाद आहे की काय असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले होते. त्यातच भारताचा गोलंदाज रवींद्र जडेजाने रोहित शर्माची अशी शाळा घेतली की चक्क रोहितला हातात विराट कोहलीच्या नावाची पाटी धरावी लागली.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2- 0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच या मालिकेतला तिसरा सामना मंगळवारी गयाना येथे रंगणार आहे. या सामन्यात नवख्या खेळाडूंना संधी देणार असल्याचे संकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले होते.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे विराट व रोहित या दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे दिसून येते.
या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा व रवींद्र जडेजा एक गेम खेळताना दिसत आहे. यामध्ये रोहित एक कार्ड न बघता जडेजाला दाखवत आहे. त्यात जडेजा इशाऱ्यामध्ये त्या कार्डवर काय लिहिले आहे हे रोहितला समजविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावर रोहित शर्मा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये विराट कोहलीसह, जसप्रीत बुमराह यांची अॅक्टींग करताना दिसला.
वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सर्व आरोप फेटाळून लावले.
या सर्व चर्चांवर कोहली म्हणाला की,'' मी पण खूप काही ऐकले आहे. पण, संघात तसं काहीच नाही. जर ड्रेसिंग रुमचे वातावरणं चांगले नसते तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरीचा आलेख चढा राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. ऑल इज वेल... अशा चर्चा येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा चर्चा होणे दुर्दैवी असल्याचे त्याने स्पष्ट केले.