मुंबई : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असला आहे, परंतु संघातील चुरस पाहता त्याचे वर्ल्ड कप खेळणे अशक्यच वाटत आहे. मात्र, अजिंक्यनं तरिही आशा सोडलेल्या नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत त्याला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पण, हे नैराश्य मागे टाकून पुन्हा नव्या दमाने मैदानावर उतरण्यासाठी अजिंक्य सज्ज होत आहे. क्रिकेटमधील खरा जंटलमन असलेला हा फलंदाज मैदानाबाहेरही माणूसकी जपणारा व्यक्ती आहे. त्यानं मंगळवारी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओतून त्याच्यातला सामाजिक जाण असलेला व्यक्ती पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करणाऱ्या या व्हिडीओत अजिंक्यनं सर्वांना एक आवाहन केलं आहे.
मी आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये नक्की खेळणार- अजिंक्य रहाणेसचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोघेही संघात असताना अजिंक्य रहाणे कधीही ‘पोस्टर बॉय’ बनू शकला नाही. मात्र, टीम इंडियाला ज्या फलंदाजांनी पुढे नेले, त्यात अजिंक्यच्या नावाचा उल्लेख जरूर होईल. जसे सचिनच्या काळात राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीचे स्थान होते, तसेच आता अजिंक्यचेही आहे. तो कसोटी क्रिकेटचा आत्मा तर आहे. कारण जोहान्सबर्गपासून लॉर्ड्सपर्यंत त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत शतके झळकाविली आहेत. विंडिजमध्ये चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके आणि गेल्या दोन वर्षांत टी२० क्रिकेटमध्ये ३ शतके झळकाविल्यानंतरही अजिंक्य भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघात नाही. मात्र, त्याला विश्वचषक संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे.
( मी आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये नक्की खेळणार- अजिंक्य रहाणे )