मुंबई : भारताच्या वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने त्याला 'हिटमॅन' हे टोपणनाव कोणी दिले, याबाबतचा खुलासा केला आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चार जेतेपद जिंकणारा रोहित पहिलाच कर्णधार आहे. आयपीएल विजेतेपदानंतर त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आणि त्यातूनच हिटमॅन हे टोपणनाव कसे मिळाले याचे उत्तर मिळाले.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएल जेतेपद उंचावले. मुंबईने अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचा चषक उंचावला आहे. आयपीएलची सर्वाधिक जेतेपदही आता मुंबई इंडियन्सच्या नावावर जमा झाली आहेत. या जेतेपदानंतर रोहितने सोशल मीडियावर संवांद साधला. तो म्हणाला,''2013साली मी जेव्हा वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले त्यावेळी स्टार स्पोर्ट्सच्या प्रोडक्शन हाऊसमधील पिडी या व्यक्तीनं मला तू भारतीय संघाचा हिटमॅन असल्याचे संबोधले होते. त्यानंतर अनेक समालोचकांनी माझा याच नावाने उल्लेख करण्यास सुरुवात केली.''
32 वर्षीय रोहितने यावेळी त्याला कोणते खाद्य आवडते, त्याचा जवळचा मित्र कोण? अशा अनेक प्रश्नांवर दिलखुलास गप्पाही मारल्या.
पाहा व्हिडीओ...