Video : मुंबईच्या रस्त्यांवर Rohit Sharma ने चालवली आलिशान Lamborghini...

कारच्या नंबर प्लेटने वेधले चाहत्यांचे लक्ष...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 09:52 PM2024-08-16T21:52:34+5:302024-08-16T22:01:24+5:30

whatsapp join usJoin us
Video : Rohit Sharma was seen driving a luxurious Lamborghini on the streets of Mumbai | Video : मुंबईच्या रस्त्यांवर Rohit Sharma ने चालवली आलिशान Lamborghini...

Video : मुंबईच्या रस्त्यांवर Rohit Sharma ने चालवली आलिशान Lamborghini...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Lamborghini on Mumbai Road : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या ब्रेकवर आहे. आपल्या ब्रेकचा तो पुरेपूर आनंद घेत आहे. नुकताच, रोहित शर्मामुंबईच्या रस्त्यांवर आपली आलिशान Lamborghini कार चालवताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्माच्या गाडीच्या नंबर प्लेटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

रोहित मुंबईच्या रस्त्यांवर आपली आलिशान Lamborghini घेऊन जाताना चाहत्यांनी त्याला लगेच ओळखले. याचे कारण म्हणजे, रोहित शर्माच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीचा नंबर 0264 आहे. हा आकडा रोहित शर्माच्या वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम धावसंख्येचा आहे. हिटमॅनने 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची ऐतिहासिक इनिंग खेळली होती. वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. आतापर्यंत कुणालाही हा रेकॉर्ड मोडता आलेला नाही.

ब्रेकचा आनंद घेतोय हिटमॅन 
काही दिवसांपूर्वीच भारतीय टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे भारताला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माने ब्रेक घेतला असून, तो सध्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे. रोहित शर्माला दुलीप ट्रॉफीमध्येही ब्रेक देण्यात आला आहे. आता तो थोट बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानावर उतरेल. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर न्यूझीलंड आणि त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

Web Title: Video : Rohit Sharma was seen driving a luxurious Lamborghini on the streets of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.