भारताचा गोलंदाज एस श्रीसंत ( S Sreesanth) ७ वर्षांची बंदी संपवून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरला. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी केरळच्या संभाव्या १५ जणांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. ३७ वर्षीय श्रीसंत मैदानावर जुन्याच अंदाजात दिसला. सराव सामन्यात त्यानं फलंदाजांशी स्लेजिंग केलं आणि त्यांना टशनही दिलं. १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धा सुरू होणार आहे.
सप्टेंबरमध्ये त्याच्यावरील बंदीचा कालावधी संपला आणि तो पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी पात्र ठऱला. ऑगस्ट २०१९ मध्ये BCCI नं त्याच्यावरील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील ( २०१३) आजीवन बंदी उठवली. BCCIचे लोकपाल डी के जैन यांनी त्याच्या बंदीचा कालावधी सात वर्षांचा केला. त्यामुळे श्रीसंत आता पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे इतक्या वर्षानंतर परतलेल्या श्रीसंतची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आक्रमकपणा हिच त्याची ओळख आहे आणि त्यानं ती जपलेली पाहायला मिळाली.
पाहा व्हिडीओ...