IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन यानं ( Ishan Kishan) पदार्पणाच्या सामन्यात धडाकेबाज खेळी केली. शिखर धवनच्या जागी सलामीला खेळण्याची संधी मिळालेल्या इशाननं ३२ चेंडूंत ५६ धावा चोपल्या. इशाननं पाच चौकार व ४ षटकार खेचले आणि पदार्पणात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. शिवाय ट्वेंटी-20 पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो अजिंक्य रहाणेनंतर ( Ajinkya Rahane) पहिला भारतीय ठरला. कर्णधार विराट कोहलीसह त्यानं दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटनंही ४९ चेंडूंत नाबाद ७३ धावांची खेळी केली. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng T20 Live Match इशान किशननं फक्त मॅचच नाही, तर मनही जिकंली; सामन्यानंतर त्यानं जे केलं त्याचं होतंय कौतुक!
पहिल्याच सामन्यात आत्मविश्वासानं खेळ करणाऱ्या इशाननं प्रत्यक्ष मैदानावर घडलेला एक किस्सा सांगितला. युझवेंद्र चहल ( BCCI.tv to Yuzvendra Chahal ) यानं सामन्यानंतर घेतलेल्या मुलाखतीत इशाननं हा किस्सा सांगितला. तो म्हणाला,''माझे अर्धशतक झालेय, हेच मला माहित नव्हते आणि जेव्हा विराट कोहली अभिनंदन करायला आला, तेव्हा मला ते समजलं.'' दिग्गज क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स, रिची रिचर्डसन यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार; जाणून घ्या कारण
जेव्हा अर्धशतक झाले, तेव्हा आम्ही पाहिलं की दोन-तीन सेकंद तू बॅटच उंचावली नव्हतीस. तुझं अर्धशतक झालंय, हे तुला माहित नव्हते का? तू थोडा नर्व्हस झाला होतास का?, असे प्रश्न चहलने त्याला विचारले. त्यावर इशान म्हणाला,''विराट भाई मागून ओरडला, ओए चारही बाजूला फिर आणि बॅट दाखव. सर्वांना बॅट दाखव, तुझी ही पहिलीच मॅच आहे.''
पाहा व्हिडीओ..