कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत १४८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू आता मोठ्या वेगानं देशभरात परसत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालय वारंवार नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनाला नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आता आरोग्य मंत्रालयाच्या मदतीला क्रिकेटचा देव मैदानावर उतरला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
सचिन म्हणाला,'' आपल्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. त्यामुळे आपण स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि गरज नसल्यास लोकांच्या भेटीगाठी टाळा. कारण हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे झपाट्यानं पसरत आहे. आजारी व्यक्तीपासून लांबच राहा. तुम्हाला स्वतः आजारी असल्यासारखे वाटल्यास हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. २० मिनिटे पाण्यानं हात धुवा. घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवा. कोरोना व्हायरसला पराभूत केले जाऊ शकते आणि आपण सर्वांनी मिळून ते करायला हवं.''
एक छोटी गोष्ट आपल्याला कोरोनापासून दूर ठेवू शकते.... सांगतोय सचिन
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द संपली?
BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?