कोरोना व्हायरसच्या संकटात शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक तंदुरुस्ती राखण्याचं आव्हान सर्वांना पेलावं लागत आहे. लॉकडाऊनमुळे क्रिकेट स्पर्धाच होत नसल्यानं खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांना फिटनेससाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. त्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं सोशल मीडियावर #KeepItUp challenge ही मोहीम सुरू केली आहे. त्यानं त्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांना नॉमिनेट केलं होतं. तेंडुलकर आणि भज्जीनं युवीचं हे चॅलेंज पूर्ण केलं. तेंडुलकरनं तर डोळ्यावर पट्टी बांधून #KeepItUp challenge पूर्ण केलं. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओच्या दुसऱ्या विंडोत त्यानं यामागची खरी गंमत सांगितली.
गुरुवारी युवीनं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तो बॅट आणि चेंडू यांच्यातील ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी त्यानं बॅट आडवी पकडली आहे. त्यांनी आता सचिन, रोहित व भज्जीला चॅलेंज दिलं आहे. पण, त्यानं भज्जीची फिरकी घेतली. तो म्हणाला,''हा टास्क सचिन आणि रोहित यांच्यासाठी सोपा आहे, परंतु भज्जीसाठी अवघडच आहे.''
भज्जीनं हे चॅलेंज पूर्ण करताना लहान बॅट घेतली आणि तीही सरळ पकडली, त्यावरून युवीनं त्याला ट्रोल केले.
सचिन तेंडुलकरनंही हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधली आणि युवीला चॅलेंज केलं. पण, त्याला या पट्टीतून सर्वकाही दिसत असल्याचेही सचिननं सांगितले.
Web Title: Video: Sachin Tendulkar completes yuvraj singh challenge with twist svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.