भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इंडियन प्रीमिअर लीगमधले पहिले अन् एकमेव शतक झळकावलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकं नावावर असलेला जगातला एकमेव फलंदाज तेंडुलकरनं आयपीएलमधील एकमेव शतकं कोणत्या संघाविरुद्ध झळकावलं होतं, हे माहीत आहे का? मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर अनेकांनी चुकीचं दिलं आहे. चला तर मग सचिनच्या या शतकाचे हायलाईट्स पाहूया.
Big News : IPL 2020 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; यंदा स्पर्धा होणार की नाही?
सचिननं 2008 ते 2013 या कालावधीत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर मुंबई इंडियन्सची जबाबदारी रोहित शर्मानं आपल्या खांद्यावर घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चार जेतेपद पटकावली. 2013मध्ये सचिनच्या निरोपाच्या आयपीएलमध्ये रोहितनं त्याला जेतेपदाची भेट दिली होती. आयपीएलच्या 2011च्या मोसमातील 13व्या सामन्यात सचिननं शतक झळकावलं होतं.
कोची टस्कर्स केरला संघाविरुद्धचा तो सामना होता. 13 दिवसांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीयांना वर्ल्ड कप विजयाचा अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवला होता. त्याच वानखेडेवर सचिननं आयपीएलमधील त्याचं पहिलं आणि एकमेव शतक झळकावलं. टस्कर्सचा कर्णधार माहेला जयवर्धनेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्ह जेकब सलामीला आले. जेकब लवकर बाद झाला, परंतु सचिननं अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. डावाच्या अखेरच्या षटकात सचिननं शतक पूर्ण केलं.
पाहा हायलाईट्स...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण; Hardik Pandya, Harbhajan Singh यांनी व्यक्त केली चिंता
Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!
BCCI बेभरवशी, पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज नाही; PCB अध्यक्षांची टीका
Video : Corona Virus ला हरवून मानवतेचा वर्ल्ड कप जिंकूया; Ravi Shastriचं आवाहन
Corona Virus Lockdown : राजस्थानवरून पायी येणारा मजूर मोहम्मद शमीच्या घराजवळ चक्कर येऊन पडला अन्...