मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं वांद्र येथील सेंट अँथोनी वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथे तो वृद्ध महिलांसोबत कॅरम खेळला आणि त्यांच्याशी संवादही साधले. तेंडुलकरने 45 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं लिहीलं की,''सेंट अँथनी वृद्धाश्रमातील या वंडर महिलांशी संवाद साधून आनंद झाला. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्यासोबत कॅरम खेळण्याचा आनंदासमोर गगन ठेंगणे."
दरम्यान, बॉक्सिंगपटू मेरी कोमनेही राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने एक व्हिडीओ शेअर केले.
पाहा व्हिडीओ
पावलं मोजणारी गॅझेट्स आली, पण आपलं चालणंच बंद झालं; मोदींचा 'फिट इंडिया'चा नारानवी दिल्ली : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'मिशन फिट इंडिया'ची घोषणा केली. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर मोदींनी फिट इंडिया मोहिमेचे महत्त्व समजावून सांगताना खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी असल्याचं सांगितलं. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी महान हॉकीपटू ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. त्यांनी तंदुरुस्तीचं महत्व सांगताना तंत्रज्ञानामुळे शारीरिक श्रम कसे कमी झाले, यावरही प्रकाश टाकला. या मोहिमेच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेनं पाऊल टाकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,'' मागील पाच वर्षांत क्रीडा क्षेत्रात सुधारणेसाठी प्रयत्न झाले. त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज विविध खेळात भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. त्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करू इच्छितो. बॅडमिंटन, टेनिस, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती आदी खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनी जिंकलेल्या प्रत्येक पदकातून त्यांचे परिश्रम आणि त्याग दिसून येतो. हा नव्या भारताचा जोश आहे.''
खेळाचं थेट नातं तंदुरूस्तीशी आहे आणि त्यामुळेच फिट इंडिया मोहिम प्रारंभ करत आहे. पण, काळानुसार बरेच काही बदलले असल्याचे सांगत मोदींनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले,'' निरोगी होणं मोठ भाग्य आहे, व्यायामामुळे निरोगी राहता येतं. चांगल्या स्वास्थामुळे चांगली कार्य सिद्धीस नेता येतात. पण, आता काळ बदलला आहे. एक उदाहरण देतो, काही दशकांपूर्वी सामान्य व्यक्ती दिवसात 8-10 किलोमीटर सहज चालायचा. पण, हळुहळू तंत्रज्ञान आले, आधुनिक साधन आले आणि लोकांचं चालणं कमी झालं. आता परिस्थिती अशी आहे की, तंत्रज्ञामुळे आपले चालणे कमी झाले आणि तेच तंत्रज्ञान आपण किती चालावे हे आपल्याला सांगत आहे.