Video : मोईन अलीला बाद करण्याची सोपी संधी गमावली; सर्फराज अहमद रापत बसला चेंडू

तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातं पाकिस्ताननं 5 धावांनी विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:50 PM2020-09-02T17:50:55+5:302020-09-02T17:53:09+5:30

whatsapp join usJoin us
Video: Sarfaraz Ahmed shockingly misses chance to stump Moeen Ali with ball in his gloves | Video : मोईन अलीला बाद करण्याची सोपी संधी गमावली; सर्फराज अहमद रापत बसला चेंडू

Video : मोईन अलीला बाद करण्याची सोपी संधी गमावली; सर्फराज अहमद रापत बसला चेंडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपाकिस्ताननं 4 बाद 190 धावा उभ्या केल्या.मोहम्मद हाफिजच्या नाबाद 86, तर हैदर अलीच्या 54 धावाइंग्लंडकडून टॉम बँटन ( 46) आणि मोईन अली ( 61) यांनी संघर्ष केला

पाकिस्तान संघानं तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत कमबॅक करताना इंग्लंड दौऱ्याचा विजयानं निरोप घेतला. अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज आणि पदार्पणाचा सामना खेळणारा हैदर अली यांच्या दमदार खेळानं पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या दौऱ्यात पहिलाच सामना खेळण्याची संधी मिळालेल्या माजी कर्णधार सर्फराज अहमदनं मात्र पुन्हा हसू करून घेतलं.

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

पाकिस्ताननं तिसरा सामना जिंकून संघात सकारात्मकता आणली असली तरी सर्फराजसाठी कालचा दिवस काही चांगला नव्हता. तिसऱ्या सामन्यासाठी मोहम्मद रिझवानच्या जागी सर्फराजला अंतिम 11मध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यातही त्यानं इंग्लंडचा फलंदाज मोईंदर अलीला बाद करण्याची सोपी संधी गमावली. सोशल मीडियावर चेंडू रापणाऱ्या सर्फराजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

190 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावातील 11व्या षटकात हा प्रकार घडला. मोईन अली 7 धावांवर खेळत होता आणि इमाद वासीमच्या गोलंदाजीवर फटका मारण्यासाठी तो पुढे आला. चेंडू सर्फराजच्या हातात गेला, परंतु तो चेंडू रापत बसला आणि मोईन अली पुन्हा क्रीजमध्ये परतला. मोईननं 33 चेंडूंत 61 धावांची खेळी करताना पाकिस्तानच्या हातून सामना हिस्कावलाच होता. 



हाफिज, हैदर अलीचे अर्धशतक
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात साजेशी झाली नाही. फाखर जमान ( 1) आणि कर्णधार बाबर आझम ( 21) लगेच माघारी परतले. त्यानंतर पदार्पणवीर हैदर अली आणि 39 वर्षीय हाफिजनं शतकी भागीदारी केली. हैदरनं 33 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा कुटल्या. हाफिजनं 52 चेंडूंत 4 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 86 धावा केल्या. ट्वेंटी-20तील त्याची ही सर्वोत्तम खेळी ठरली. पाकिस्ताननं 4 बाद 190 धावा उभ्या केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला जोरदार धक्के बसले. जॉनी बेअरस्टो ( 0), डेवीड मलान ( 7), कर्णधार इयॉन मॉर्गन ( 10) स्वस्तात बाद झाले. टॉम बँटन 31 चेंडूंत 46 धावांवर माघारी परतल्यानंतर इंग्लंडच्या हातून सामना गेल्याचे निश्चित झाले होते. पण, मोईन अलीनं 33 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 61 धावा चोपल्या. त्याला सॅम बिलिंगच्या 26 धावांची साथ मिळाली. मात्र, इंग्लंडला 8 बाद 185 धावा करता आल्या.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली

टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी 

Web Title: Video: Sarfaraz Ahmed shockingly misses chance to stump Moeen Ali with ball in his gloves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.