Legends League Cricket Masters - माजी क्रिकेटपटू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला पाहायला मिळत आहेत. Legends League Cricket Masters स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि इंडियन महाराजा संघाला आशियाई लायन्सकडून हार पत्करावी लागली. शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लायन्सने ९ धावांनी गौतम गंभीर कर्णधार असलेल्या महाराजा संघावर विजय मिळवला. या विजयानंतर आफ्रिदीने फलंदाज हरभजन सिंगला मिठी मारली अन् तो अम्पायरलाही मिठी मारायला गेला, परंतु अचानक थांबला..
चेंडू आदळला गौतम गंभीरच्या हेल्मेटवर, शाहिद आफ्रिदी लगेच धावला अन्... Video
प्रथम फलंदाजी करताना आशिया संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६५ धावा केल्या. भारत लक्ष्याचा पाठलाग करत होता. गंभीरने १३व्या षटकात आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. १४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गंभीरने रझाकच्या चेंडूवर ५४ धावांवर आपली विकेट गमावली. आशियाने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताला १५६ धावा करता आल्या आणि ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक 54 धावा केल्या . आशियाकडून मिसबाह-उल-हकने सर्वाधिक ७३ धावा केल्या. शाहिद आफ्रिदीला केवळ १२ धावा करता आल्या.
सामन्यानंतर विजयाचं सेलिब्रेशन करताना आफ्रिदीने महाराजा संघाच्या हरभजनला मिठी मारली. तो अम्पायरकडे वळला, पण त्याच्या लक्षात आले की ती महिला अम्पायर आहे. त्यामुळे त्याने स्वतःला सावरले अन् हात लेडी अम्पायरला हात मिळवला. पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"