Legends League Cricket T20 - गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी समोरासमोर यायचे तेव्हा वातावरण नेहमीच तापलेले असायचे. दोघेही मैदानावर अनेकदा भिडले आहेत आणि अनेक मुद्यांवरून आजही मैदानाबाहेर या खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळतेच. गंभीर आणि आफ्रिदी काल पुन्हा एकमेकांसमोर मैदानावर आले. इंडियन महाराजाचा कर्णधार गौतम गंभीर आणि आशियाई लायन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदी हे Legends League Cricket T20 च्या निमित्ताने पुन्हा समोरासमोर आले. यावेळी नाणेफेक करताना गौतम गंभीरने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराकडे पाहिलेही नाही, पण भारतीय फलंदाजाच्या हेल्मेटवर जेव्हा चेंडू आदळला तेव्हा आफ्रिदीचे मन विरघळले अन्...
प्रथम फलंदाजी करताना आशिया संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६५ धावा केल्या. भारत लक्ष्याचा पाठलाग करत होता. १२व्या षटकात अब्दुल रझाकचा चेंडू गंभीरच्या हेल्मेटला लागला तेव्हा गंभीर ४३ धावांवर खेळत होता. चेंडू त्याच्या हेल्मेटसमोरच्या फ्रेमवर आदळला. त्यानंतर आफ्रिदी त्याच्याकडे गेला आणि त्याने गंभीरला त्याची तब्येत विचारली. तो ठीक असल्याचे गंभीर म्हणाला.
गंभीरने १३व्या षटकात आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. १४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गंभीरने रझाकच्या चेंडूवर ५४ धावांवर आपली विकेट गमावली. आशियाने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताला १५६ धावा करता आल्या आणि ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक 54 धावा केल्या . आशियाकडून मिसबाह-उल-हकने सर्वाधिक ७३ धावा केल्या. शाहिद आफ्रिदीला केवळ १२ धावा करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Video : Shahid Afridi inquires if Gautam Gambhir is ok after that blow, both player squared off as India Maharajas and Asia Lions took on each other in a Legends League Cricket T20 match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.