Legends League Cricket T20 - गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी समोरासमोर यायचे तेव्हा वातावरण नेहमीच तापलेले असायचे. दोघेही मैदानावर अनेकदा भिडले आहेत आणि अनेक मुद्यांवरून आजही मैदानाबाहेर या खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळतेच. गंभीर आणि आफ्रिदी काल पुन्हा एकमेकांसमोर मैदानावर आले. इंडियन महाराजाचा कर्णधार गौतम गंभीर आणि आशियाई लायन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदी हे Legends League Cricket T20 च्या निमित्ताने पुन्हा समोरासमोर आले. यावेळी नाणेफेक करताना गौतम गंभीरने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराकडे पाहिलेही नाही, पण भारतीय फलंदाजाच्या हेल्मेटवर जेव्हा चेंडू आदळला तेव्हा आफ्रिदीचे मन विरघळले अन्...
प्रथम फलंदाजी करताना आशिया संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६५ धावा केल्या. भारत लक्ष्याचा पाठलाग करत होता. १२व्या षटकात अब्दुल रझाकचा चेंडू गंभीरच्या हेल्मेटला लागला तेव्हा गंभीर ४३ धावांवर खेळत होता. चेंडू त्याच्या हेल्मेटसमोरच्या फ्रेमवर आदळला. त्यानंतर आफ्रिदी त्याच्याकडे गेला आणि त्याने गंभीरला त्याची तब्येत विचारली. तो ठीक असल्याचे गंभीर म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"