"बॉलिंग टाकतो क्विक, रन पण..."; लग्नानंतर शार्दुल ठाकूरने घेतला मराठी उखाणा, पाहा Video

लग्न झाल्यानंतर शार्दुलने पत्नीसाठी उखाणा घेतलेल्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:42 PM2023-03-01T19:42:01+5:302023-03-01T19:52:35+5:30

whatsapp join usJoin us
Video: Shardul Thakur get the Marathi Ukhana For his wife after marriage | "बॉलिंग टाकतो क्विक, रन पण..."; लग्नानंतर शार्दुल ठाकूरने घेतला मराठी उखाणा, पाहा Video

"बॉलिंग टाकतो क्विक, रन पण..."; लग्नानंतर शार्दुल ठाकूरने घेतला मराठी उखाणा, पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि मिताली परूळकर नुकतेच विवाहबंधनात अडकले. शार्दुल आणि मिताली परुळकर यांचा नोव्हेंबर २०२१ मध्ये साखरपुडा झाला होता. १५ महिन्यांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

शार्दुल-मितालीच्या लग्नसोहळ्याला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्नी रितिकासह हजेरी लावली होती. याशिवाय श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री हे सुद्धा शार्दुलच्या लग्नसोहळ्यातले वऱ्हाडी होते. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर या वर्षी लग्न करणारा शार्दुल ठाकूर हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. 

लग्न झाल्यानंतर शार्दुलने पत्नीसाठी उखाणा घेतलेल्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. ''बॉलिंग टाकतो क्विक...रन पण धावले क्विक...मिताली आमची सुंदरतेचं प्रतिक!'', असा उखाणा शार्दुलने घेतला आहे. त्याने स्वत: हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

शार्दुलची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे.  तर पालघरचा असणारा शार्दूल आधी आयपीएलमधून सर्वांसमोर आला होता. सुरुवातीला काही संघातून खेळण्यानंतर धोनीच्या कॅप्टन्सीखाली चेन्नई सुपरकिंगमध्ये शार्दूलचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर तिथेही त्याने आपली खास जागा बनवली. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत मिळून ठोकलेलं एक अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं.

शार्दूल ठाकूरचा झिंगाट डान्स-

हळदीच्या कार्यक्रमात शार्दूल ठाकूरने झिंगाट गाण्यावर सैराट डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यंदा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार

शार्दुल आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. ३१ वर्षीय शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी आठ कसोटी, ३४ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान शार्दुलने कसोटीत २७, एकदिवसीय सामन्यात ५० आणि टी-२० मध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शार्दुलचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Video: Shardul Thakur get the Marathi Ukhana For his wife after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.