भारत-पाकिस्तान क्रिकेट म्हणजे हायव्होल्टेज ड्रामा. त्यामुळेच उभय देशांमधील अनेक किस्से आजही सांगितले जातात. पण, आज पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं एक किस्सा सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पाकिस्तान दौऱ्यावरील हा प्रसंग आहे. एका लाईव्ह चॅटमध्ये अख्तरनं सांगितलं की, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला तो मारायला गेला होता, परंतु त्याच नशीब चांगलं होतं आणि तो वाचला.
अख्तर म्हणाला की,''मी हरभजन सिंगला मारायला त्याच्या हॉटेल रूममध्ये गेलो होतो. त्याच्या रुमची मी चावीपण बनवून घेतली होती. पण, त्याचं नशीब चांगलं होतं. आमच्यासोबत खातो, लाहोरमध्ये फिरतो, आपली संस्कृती ( पंजाबी) एक आहे आणि आमची बदनामी करतोस? तेव्हा मी त्याला म्हणलो होतो की हॉटेल रुममध्ये येऊन मारेन. त्याला ही माहीत होतं, मी येऊन त्याला मारेन. तो त्या दिवशी मला भेटला नाही. एक दिवसानंतर माझा राग शांत झाल्यावर मला तो भेटला आणि माफी मागितली.''
पाहा अख्तर काय म्हणाला...
वीरेंद्र सेहवाग खोटारडा
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यातल्या एका किस्स्यावर पाक गोलंदाजानं मौन सोडले. 16 वर्षांपूर्वी जेव्हा वीरूनं मुल्तान कसोटीत पाकिस्तानविरुद्ध 309 धावांची खेळी केली होती. भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना स्ट्राईकवर असलेल्या वीरूला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब वारंवार बाऊंसर टाकत होता. तेव्हा वीरूनं त्याला नॉनस्ट्राईकवर उभ्या असलेल्या तेंडुलकरला बाऊंसर टाकण्यास सांगितले. वीरू अख्तरला म्हणाला होता 'समोर बाप आहे, त्याला हुक मारण्यास सांग.''
अख्तरनं असं काही घडलंच नसल्याचा दावा केला आहे. सेहवाग जगाला खोटी गोष्ट सांगतोय, असा अख्तर म्हणाला. त्यानं पुढं म्हटलं की, मला असं कोणी बोलेल आणि मी त्याला असंच सोडून देईन, असं होईल का? वीरूला मी भेटलो तेव्हा याबाबत विचारलं होतं, तेव्हा त्यानं असं काही म्हटलं नाही, असं मला सांगितलं. तेव्हा गौतम गंभीरही तिथेच होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ऑल टाईम IPL संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं निवडला संघ
कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी
ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerला भारतीय दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर!
धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी
महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार
टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?
IPL 2020च्या आयोजनासाठी UAEकडून प्रस्ताव? BCCI कडून अपडेट
Web Title: Video : Shoaib Akhtar Reveals He had Gone to Hit Harbhajan Singh in Hotel Room svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.