पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरची सध्या जोरदार चर्चा आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्याचा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता. या मालिकेतून उभा राहणारा निधी कोरोना व्हायरसच्या मदतनिधीत वाटला जाईल असेही त्याचे म्हणणे होते. त्याच्या या प्रस्तावावर जोरदार टीका झाली. भारताचे वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनीही अख्तरला खडेबोल सुनावले. त्यानंतर अख्तरनं भारताकडे 10 हजार व्हेटिंलेटरची मागणी केली, त्यावरही जोरदार टीका झाली. पण, आता अख्तरनं नवा प्रताप केला आहे आणि नेटिझन्सने त्याला फैलावर घेतले.
शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर त्याच्यावर नेटिझन्स तुटून पडले. या व्हिडीओत अख्तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रस्त्यावंर सायकर चावलताना दिसत आहे. मास्क न घातला तो सायकल चालवत होता आणि इस्लामाबादचे कौतुक करत होता. नेटिझन्सनं त्याला लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे ट्रोल केले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ग्लेन मॅक्सवेल अन् भारतीय मुलीची Untold Love Story; अशी पडली ऑसी खेळाडूची विकेट!
मोठी बातमी : भारताच्या क्रिकेटपटूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!
Corona Virusनं भारताच्या अम्पायरला झाडावर चढवले; नेमके काय घडले?
देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच
Corona Virus : विराट कोहलीपाठोपाठ RCBचा मदतीचा हात; सैन्य, आरोग्य सेवकांसाठी मोठा निर्णय