रणजी करंडक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. त्यात विदर्भ आणि आंध्रप्रदेश यांच्यातील सामना विशेष ठरला. या सामन्यात मैदानावर उतरताच विदर्भच्या वासीम जाफरनं इतिहास रचला. 150 रणजी सामने खेळणारा तो देशातला पहिलाच फलंदाज ठरला. पण, या सामन्यात असा एक पाहूणा आला की ज्यानं सर्वांची तारांबळ उडवली. सामना सुरु असताना मैदानावर अचानक साप आला आणि त्यामुळे खेळ काही काळ थांबवण्यात आला होता.
आंध्रप्रदेश आणि विदर्भ यांच्यातला हा सामना विजयवाडा येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात आंध्र संघानं प्रथम फलंदाजी करतान उपहारापर्यंत 3 बाद 87 धावा केल्या आहेत. सीआर ज्ञानेश्वर ( 8) आणि प्रसंथ कुमार ( 10) या सलामीवीरांना अनुक्रमे रंजीश गुरबानी आणि यश ठाकूर यांनी माघारी पाठवले. ठाकूरनं आंध्रला आणखी एक धक्का देताना रिकी भूईला ( 9) बाद केले. पण, कर्णधार हनुमा विहारी आणि श्रीकर भरत यांनी संघाचा डाव सावरला. विहारी 43 धावांवर, तर भरत 13 धावांवर खेळत आहे. मैदानावर अचानक साप आल्यानं काही काळ सामना थांबवावा लागला होता.
पाहा व्हिडीओ...