Cricket Video, County Championship: मॅच संपायला १० मिनिटं बाकी, १० फिल्डर्सनी फलंदाजाला घेरलं अन् मग...

Viral Video, County Cricket Championship: इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सॉमरसेट आणि सरे यांच्यात रोमांचक सामना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:45 PM2024-09-13T15:45:10+5:302024-09-13T15:46:02+5:30

whatsapp join usJoin us
VIDEO Somerset vs Surrey 10 minutes left in the match 10 fielders surrounded batsman and won the match | Cricket Video, County Championship: मॅच संपायला १० मिनिटं बाकी, १० फिल्डर्सनी फलंदाजाला घेरलं अन् मग...

Cricket Video, County Championship: मॅच संपायला १० मिनिटं बाकी, १० फिल्डर्सनी फलंदाजाला घेरलं अन् मग...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Viral Video cricket fielding, Somerset vs Surrey County Cricket Championship: इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सॉमरसेट आणि सरे यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. संपूर्ण सामना रंजक झाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी एक विलक्षण धमाल पाहायला मिळाली. खेळ संपायला फक्त १० मिनिटं बाकी होती आणि सॉमरसेट संघाला विजयासाठी एका विकेटची गरज होती. या १० मिनिटांत निकाल लागणार होता. सरेचे फलंदाज १० मिनिटं विकेट राखून खेळले असते तर त्यांना सामना वाचवता आला असता. पण तसे झाले नाही. सामन्याच्या शेवटच्या १० मिनिटांत स्ट्राइकवर असलेल्या डॅनियल वॉरॉलला सर्व १० फिल्डर्सने घेरले. त्यामुळे तो दबावाखाली आला आणि अखेर बाद झाला. सॉमरसेटने हा सामना ११२ धावांनी जिंकला.

३ स्लिप, १ लेग स्लिप, २ शॉर्ट लेग, १ सिली पॉइंट

सॉमरसेटचा कर्णधार लुईस ग्रेगरी आणि लेफ्ट आर्म स्पिनर जॅक लीच यांनी सामना जिंकवला. ग्रेगरीने अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षण लावले. त्याने सर्व क्षेत्ररक्षकांना फलंदाजाच्या आसपास ठेवले. स्ट्राईकवर असलेल्या डॅनियल वॉरॉलला बाद करण्यासाठी ग्रेगरीने ३ स्लिप, १ लेग स्लिप, २ शॉर्ट लेग, १ सिली पॉइंट, १ ​​शॉर्ट मिड ऑन आणि १ फील्डर शॉर्ट कव्हरवर ठेवला. एक खेळाडू विकेटकीपिंग करत आहे. अशा प्रकारे त्याने सर्व १० फिल्डरसह फलंदाजाला घेरले. यामुळे वॉरल दबावाखाली आला आणि लीचच्या चेंडूवर बचाव करण्याचा प्रयत्न करताना LBW आऊट झाला.

सॉमरसेटच्या या रोमहर्षक विजयात संघाचे फिरकीपटू जॅक लीच आणि आर्ची वॉन यांचे महत्त्वाचे योगदान होते. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकेल वॉनचा मुलगा आर्चीने या सामन्यात एकूण ११ विकेट्स घेतल्या. तर लीचने ९ विकेट्स घेतल्या. दोघांनी मिळूनच २० विकेट्स घेत सामना जिंकला.

Web Title: VIDEO Somerset vs Surrey 10 minutes left in the match 10 fielders surrounded batsman and won the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.