सिडनी : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथवर एका वर्षाची बंदी आणली होती. पण स्मिथला आपली चूक उमगली आहे. त्यामुळे आता तो भावुक झाला असून मला पुन्हा खेळायचे आहे, असे तो म्हणत आहे.
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा रणनितीचाच असल्याचे मान्य केले. त्यानंतर या साऱ्या प्रकाराचा सूत्रधार वॉर्नर असल्याचे पुढे आले आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली. त्यानंतर बीसीसीआयनेही त्याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवला.
वॉर्नर केप टाऊन येथून सिडनीच्या विमानतळावर उतरला. त्यावेळी त्याची पत्नी आपल्या दोन्ही मुलांसह वॉर्नरला भेटायला आली होती. वॉर्नरच्या कृत्याविषयी लोकांच्या मनात चीड होती आणि त्यांनी आपला राग व्यक्त केला. हे सारे पाहून कँडीसाला आपले अश्रू अनावर झाले. त्यामुळे वॉर्नर विमानतळावर जास्त काळ थांबला नाही.
Web Title: video: Steven Smith became emotional; Said, I want to play again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.