Video: मॅच संपल्यानंतर तुफान राडा! श्रीलंकन-भारतीय फॅन्स एकमेकांशी भिडले, तुंबळ हाणामारी

श्रीलंकन चाहत्यांना पराभव पचवता आला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 05:30 PM2023-09-13T17:30:06+5:302023-09-13T17:32:56+5:30

whatsapp join usJoin us
Video: Storm cry after the match! Sri Lankan-Indian fans clashed, a scuffle took place, video went viral | Video: मॅच संपल्यानंतर तुफान राडा! श्रीलंकन-भारतीय फॅन्स एकमेकांशी भिडले, तुंबळ हाणामारी

Video: मॅच संपल्यानंतर तुफान राडा! श्रीलंकन-भारतीय फॅन्स एकमेकांशी भिडले, तुंबळ हाणामारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL Asia Cup 2023 Viral Video: भारतीय संघाने श्रीलंकेवर सुपर 4 च्या सामन्यात ४१ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाला १७२ धावाच करता आल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी टिपले. क्रिकेट चाहत्यांना काही वेळा त्यांच्या संघाचा पराभव पचवता येत नाही आणि त्यांच्या संघाची आणि देशाची प्रतिमा खराब होईल असे काही घडते. असाच काहीसा प्रकार भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान घडला.

आशिया कप सुपर-4 फेरीत टीम इंडियाच्या विजयानंतर श्रीलंकेचे काही चाहते इतके संतापले की त्यांनी स्टेडियममध्ये बसलेल्या भारतीय चाहत्यांना मारहाण केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीलंकन ​​चाहत्याने प्रथम भारतीय चाहत्याला शिवीगाळ केली आणि नंतर त्याला थप्पड मारत धक्काबुक्की केली. कोलंबोच्या स्टेडियममध्ये बसलेल्या इतर चाहत्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. पाहा व्हिडीओ-

भारताने गाठली अंतिम फेरी

भारतीय क्रिकेट संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाने सुपर-4 फेरीत पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. यानंतर श्रीलंकेला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. आता टीम इंडियाचा आणखी एक साखळी सामना बाकी असून शुक्रवारी बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. रविवारी अंतिम सामना होणार आहे.

Web Title: Video: Storm cry after the match! Sri Lankan-Indian fans clashed, a scuffle took place, video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.