भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खान याच्या गोलंदाजीतील भेदक मारा आजही तसाच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही क्रिकेटच्या मैदानावर झहीरच्या गोलंदाजीसमोर भल्याभल्या फलंदाजांनी शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली आहे. झहीर सध्या टी 10 लीगमध्ये दिल्ली बुल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यानं एका सामन्यात षटकात दोन विकेट्स घेत आपला क्लास दाखवून दिला. त्याच्या या कामगिरीवर बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी भलतीच खूश झाल्याचे पाहायला मिळाले.
टी 10 लीगच्या दिल्ली बुल्स आणि कलंदर्स यांच्यातल्या सामन्यातील हा प्रसंग आहे. झहीरनं या सामन्यात 2 षटकांत 8 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे झहीरनं दोन्ही विकेट्स एकाच षटकात घेतल्या. 41 वर्षीय झहीरच्या या कामगिरीनंतरही दिल्ली बुल्स संघाला विजय मिळवता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला 8 बाद 98 धावा करता आल्या. दिल्लीच्या मोहम्मद नबीनं 21 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 48 धावा चोपल्या. कलंदर्स संघानं हे आव्हान 3 विकेट राखून पार केले. पण, झहीरच्या गोलंदाजीवर सनी लियोनी भारीच खूश दिसली.
पाहा व्हिडीओ...
KKRनं डच्चू दिलेल्या फलंदाजानं सहा दिवसांत झळकावली चार अर्धशतकंइंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. यात कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीनचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे. लीनला डच्चू देण्याचा निर्णयाचा पश्चाताप KKRला होत आहे. कारण, लीननं टी 10 लीगमध्ये मागील सहा दिवसांत चार अर्धशतकी खेळी केली.
टी 10 लीगमध्ये युवराज सिंग प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठा अरेबियन्स संघाकडून लीननं ही खेळी साकारली. टी 10 तिसऱ्याच सामन्यात लीननं 30 चेंडूंत नाबाद 91 धावा चोपल्या होत्या. लीनची ही फटकेबाजी अजूनही कायम आहे. त्यानंतर त्यानं कर्नाटका टस्कर्स संघाविरुद्ध 31 चेंडूंत 2 चौकार व 6 षटकार खेचून 61 धावा चोपल्या. दिल्ली बुल्स संघाविरुद्धही त्यानं 33 चेंडूंत 5 चौकार व 9 षटकारांसह 89 धावा कुटल्या. शनिवारीही लीननं कलंदर संघाविरुद्ध 30 चेंडूंत 67 धावांची वादळी खेळी केली. यात त्यानं 4 चौकार व 6 षटकारांचा समावेश आहे.