कोलकाता विरूद्ध हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जगदीश सुचिथला हैदराबादने संधी दिली. कोलकातानेदेखील संघात तीन बदल केले. आरोन फिंच, शेल्डन जॅक्सन आणि अमन खान या तिघांना संघात संधी देण्यात आली. तर अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि रसिख सलाम यांना संघाबाहेर करण्यात आले. कोलकाताच्या डावातील व्यंकटेश अय्यरची विकेट विशेष चर्चेत राहिली.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना आरोन फिंचची विकेट स्वस्तात गमावली. तो ७ धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर व्यंकटेश अय्यरने चांगली कामगिरी करण्यास सुरूवात केली होती. पण केन विल्यमसनने टी नटराजनला गोलंदाजी देत चाल खेळली आणि ती यशस्वी ठरली. नटराजनने अय्यरला इनस्विंगर चेंडू टाकला. अय्यरला मात्र चेंडू समजलाच नाही. त्यामुळे त्याने चेंडू चुकीच्या दिशेने खेळला आणि तो त्रिफळचीत झाला.
कोलकाता नाइट रायडर्स: आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (किपर), पॅट कमिन्स, सुनील नरिन, उमेश यादव, अमन खान, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (किपर), एडन मार्करम, शशांक सिंग, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन