सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने अवघ्या ४९ बॉलमध्ये १०३ धावा केल्या. त्यात त्याने ११ चौकार आणि ६ षटकार लगावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 02:21 PM2023-05-13T14:21:52+5:302023-05-13T14:23:21+5:30

whatsapp join usJoin us
Video: Suryakumar Yadav’s six off Mohammad Shami has Sachin Tendulkar in disbelief | सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video

सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा २७ धावांनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादवने झळकावलेले स्फोटक नाबाद शतक मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत बाद २१८ धावा केल्यानंतर गुजरातला २० षटकांत ८ बाद १९१ धावांवर रोखले.

सूर्यकुमार यादवने अवघ्या ४९ बॉलमध्ये १०३ धावा केल्या. त्यात त्याने ११ चौकार आणि ६ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवने सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव याच्या वादळी फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने २०० धावांचा पल्ला पार केला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव याने आक्रमक फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव याने पहिल्या ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर पुढील १७ चेंडूत ५३  धावा केल्या. 

सूर्यकुमार यादवच्या या खेळीत दोन शॉट्स, विशेषत: थर्ड-मॅनच्या दिशेने मारलेला षटकाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सुर्याच्या या षटकाराने क्रिकेट विश्वातील देव म्हणून ओळखले जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरला देखील आर्श्चचकित केले. सचिनची रिअॅक्शन देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

आज हैदराबादविरुद्ध लखनौ

आज हैदराबादच्या घरच्या मैदानावर म्हणजेच राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. लखनौ सुपर जायंट्स संघाला त्यांच्या मागील सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद संघाने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.

पंजाबविरुद्ध दिल्ली

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघांनी त्यांच्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. असं असलं तरी दिल्ली कॅपिटल्स संघाचं यंदाच्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. पण, पंजाबसाठी आजच्या सामन्याच्या निर्णयावर आशा कायम आहे. आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल.

Web Title: Video: Suryakumar Yadav’s six off Mohammad Shami has Sachin Tendulkar in disbelief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.