बऱ्याच काळानंतर आज भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटच्या मैदानावर लढाई होणार आहे. आशिया कपमधील सर्वात रोमांचक सामना असणार आहे. अशातच दोन्ही संघांवर दबाव आहे, यातच रात्री पाकिस्तानचे खेळाडू शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रऊफ हे भारतीय संघातील खेळाडूंच्या भेटीला गेले होते.
भारत-पाकिस्तान सामना आज दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंच्या भेटीचा व्हिडिओ आला आहे. पीसीबीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हरिस रौफ आणि विराट कोहली एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दोघांनी पन्नास षटकांच्या फॉर्मॅटबद्दल एकमेकांशी चर्चा केली. रौफने मोहम्मद सिराज याच्याशीही चर्चा केली.
विराटने शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांच्याशीही चर्चा केली. विराटने पाकिस्तानी खेळाडूच्या बॅटची लूज झालेली ग्रिपही टाईट करून दिली. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांचीही भेट झाली.
रौफ आणि विराटमध्ये काय चर्चा झाली...विराट रौफला सांगतो की मोठ्या स्पर्धा येत आहेत. विराटचा इशारा विश्वचषकाकडे होता. हे ऐकून हारिस रौफ म्हणाला की मी वेडा होतोय. बॅक टू बॅक मॅचेस आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे रौफने विराट कोहलीला नेटमध्ये गोलंदाजी केली होती.