Tom Latham Six Video: खळ्ळ खट्याक... फलंदाजाच्या दमदार सिक्सरने फुटली खिडकीची काच

न्यूझीलंडच्या फलंदाजाने थेट स्टेडियममध्ये मारला षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:14 PM2022-07-16T19:14:18+5:302022-07-16T19:14:49+5:30

whatsapp join usJoin us
Video Tom Latham six breaks glass window new Zealand vs Ireland third odi watch | Tom Latham Six Video: खळ्ळ खट्याक... फलंदाजाच्या दमदार सिक्सरने फुटली खिडकीची काच

Tom Latham Six Video: खळ्ळ खट्याक... फलंदाजाच्या दमदार सिक्सरने फुटली खिडकीची काच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Tom Latham Six Video: न्यूझीलंडने आयर्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने तिसरा सामना जिंकत ३-० ने मालिका खिशात घातली. शनिवारी या मालिकेतील तिसरा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात मार्टिन गप्टिलने शानदार शतक झळकावले. पण न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने धमाकेदार षटकार ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लॅथमच्या सिक्सने स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना धावाधाव करायला भाग पाडले. या सोबतच चेंडू थेट केबिनच्या खिडकीवर आदळल्याने काच फुटली.

सामन्यात कर्णधार लॅथमने 26 चेंडूत 30 धावा केल्या. या दरम्यान त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. ऑफ स्पिनर अँडी मॅकब्राईनच्या चेंडूवर लॅथमने हा षटकार ठोकला. चेंडू सीमापार होताच स्टँडमधील केबिनच्या खिडकीवर आदळला. त्यामुळे खिडकीची काच फुटली. यावेळी प्रेक्षकही बचावासाठी इकडे तिकडे धावताना दिसले. यावर खिल्ली उडवत न्यूझीलंड ब्रॉडकास्टर स्पार्क स्पोर्ट्सने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'टॉम लॅथम, आयरिश लोकांचे मन आणि खिडक्या दोन्ही तोडत आहे.'

लॅथमच्या सिक्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल-

दरम्यान, मालिकेतील तीनही सामने डब्लिनमध्ये खेळले गेले. शेवटचा सामना हाय-स्कोरिंग होता. न्यूझीलंडने अवघ्या एका धावेने विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 360 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने 359 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमकुवत संघ मानल्या जाणाऱ्या आयर्लंडने हा सामना गमावला असला तरी त्यांच्यासाठी हा एक अविस्मरणीय सामना ठरला.

Web Title: Video Tom Latham six breaks glass window new Zealand vs Ireland third odi watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.