भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्यासाठी इंग्लंडचे सर्व खेळाडू आज चेन्नईत दाखल झाले, तर टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane), शार्दूल ठाकूर आणि रोहित शर्मा मंगळवारीच येथे दाखल झाले आहेत. अजिंक्य, शार्दूल आणि रोहित हे आता क्वारंटाईन कालावधीत आहेत. त्यांना सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
या मालिकेत BCCIनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आपापल्या पत्नी व मुलांसोबत या दौऱ्यावर असणार आहेत. बुधवारी अजिंक्यची पत्नी राधिका हिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. क्वारंटाईनच्या पहिल्या दिवशी अजिंक्य मुलगी आर्यासोबत डान्स करताना दिसत आहे. Virat Kohli in Legal Trouble: विराट कोहलीला झटका, केरळ उच्च न्यायालयानं पाठवली नोटिस
पाहा व्हिडीओ...
कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होईल, हे सामने अनुक्रमे १२, १४, १६, १८ व २० मार्चला अहमदाबाद येथेच होती. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल होतील. हे सामने २३, २६ व २८ मार्चला खेळवले जातील.