Rishabh Pan Instagram Live with Rohit Sharma, Suryakumar Yadav : भारतीय ट्वेंटी-२० संघाचे खेळाडू मंगळवारी कॅरेबियन बेटावर दाखल झाले. २९ जुलैपासून पाच सामन्यांच्या भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies T20I Series) ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीच आहे आणि आजचा तिसरा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न आहे. ट्वेंटी-२० मालिकेसाठी दाखल झालेल्या रिषभ पंतने मंगळवारी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल यांच्याशी संवाद साधला. अधुनमधून हे सर्व चाहत्यांशीही संवाद साधताना दिसले.
MS Dhoni Suprise visit on Instagram Live : रिषभच्या या इंस्टा लाईव्हमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचीही सप्राईज एन्ट्री झाली. सुरुवातीला साक्षीने या लाईव्हमध्ये सहभाग घेतला आणि नंतर मोबाईलचा कॅमेरा धोनीकडे सरकवला. धोनीची एक झलक दिसताच चाहते तर खूश झालेच, शिवाय भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. पण, धोनी लगेच लाईव्हमधून बाहेर पडला.
याचवेळी मुंबईच्या एका क्रिकेट चाहत्याची एन्ट्री झाली आणि तो मराठीत गप्पा मारू लागला. सूर्यकुमार व रोहित त्याच्याशी मराठीत बोलताना दिसले. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या शेवटी चाहत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला अन्...
भारताचा टी२० संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक,
रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
ट्वेंटी-२० मालिका-
२९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन
१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)
Web Title: Video : Victory to Chhatrapati Shivaji Maharaj!; Rohit Sharma, Rishabh Pant, Suryakumar Yadav cheered on instagram live with fan, Mumbai Indians share video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.