Join us  

"छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!", रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव यांचा जयघोष, Mumbai Indians ने शेअर केला Video 

भारतीय ट्वेंटी-२० संघाचे खेळाडू मंगळवारी कॅरेबियन बेटावर दाखल झाले. २९ जुलैपासून पाच सामन्यांच्या भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies T20I Series) ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 6:21 PM

Open in App

Rishabh Pan Instagram Live with Rohit Sharma, Suryakumar Yadav : भारतीय ट्वेंटी-२० संघाचे खेळाडू मंगळवारी कॅरेबियन बेटावर दाखल झाले. २९ जुलैपासून पाच सामन्यांच्या भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies T20I Series) ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीच आहे आणि आजचा तिसरा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न आहे. ट्वेंटी-२० मालिकेसाठी दाखल झालेल्या रिषभ पंतने मंगळवारी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल यांच्याशी संवाद साधला. अधुनमधून हे सर्व चाहत्यांशीही संवाद साधताना दिसले.

MS Dhoni Suprise visit on Instagram Live : रिषभच्या या इंस्टा लाईव्हमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचीही  सप्राईज एन्ट्री झाली. सुरुवातीला साक्षीने या लाईव्हमध्ये सहभाग घेतला आणि नंतर मोबाईलचा कॅमेरा धोनीकडे सरकवला. धोनीची एक झलक दिसताच चाहते तर खूश झालेच, शिवाय भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. पण, धोनी लगेच लाईव्हमधून बाहेर पडला.

याचवेळी मुंबईच्या एका क्रिकेट चाहत्याची एन्ट्री झाली आणि तो मराठीत गप्पा मारू लागला. सूर्यकुमार व रोहित त्याच्याशी मराठीत बोलताना दिसले. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या शेवटी चाहत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला अन्...  भारताचा टी२० संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. 

ट्वेंटी-२० मालिका- 

२९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता) 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मारिषभ पंतसूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्स
Open in App