नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने ( DDCA) गुरुवारी फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून दिवगंत अरुण जेटली स्टेडियम असे केले. याच सोहळ्यात स्टेडियममधील एका स्टॅण्डला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आहे. या सोहळ्याला विराटसह पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. पतीचं कौतुक होताचा पाहून तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. भारतीय संघातील सदस्यही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यात शिखर धवन, रिषभ पंत, कृणाल पांड्या, लोकेश राहुल, मनिष पांडे, हार्दिक पांड्या यांचा समावेश होता.
या सोहळ्यात कोहलीच्या नावाची घोषणा होताच अनुष्का भावुक झाली आणि तिनं त्याचा हात हातात घेतला. सर्वांची नजर चुकवून अनुष्कानं हळुच कोहलीच्या हाताला किस केलं. पण, अनुष्का व कोहलीचा हा रोमँटिक क्षण कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरलही झाला.
पाहा व्हिडीओ...
कधीकाळी क्रिकेटपटूंच्या स्वाक्षरीसाठी जिथं केली धावाधाव; त्याच स्टेडियमवर आज कोहलीचं नाव!2001साली याच स्टेडियमवर भारतीय क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफसाठी कोहली धावाधाव करायचा आणि आज त्याच स्टेडियमवरील स्टॅण्डला कोहलीचे नाव देण्यात आले. यावेळी कोहलीनं कोटला स्टेडियमशी संबंधित एक आठवण सांगितली. तो म्हणाला,''या सोहळ्यासाठी घर सोडताना मी कुटुंबीयांना 2001च्या एका प्रसंगाची आठवण करून दिली. 2001 साली येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना खेळला गेला होता. आम्ही पेव्हेलियन स्टॅण्डच्या शेजारी बसलो होतो. युवराज सिंग, जवागल श्रीनाथ बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होते. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेलो मी त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागत होतो. त्यावेळी कधी असा विचारही केला नव्हता की, त्याच स्टेडियमवरील स्टॅण्डला आपले नाव दिले जाईल.''
अनुष्काच्या त्या कृतीनंतर नेटिझन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.