Join us  

Video: देव तारी त्याला.... तब्बल १२ वेळा डोक्याला लागला चेंडू, पण अजूनही क्रिकेटच्या मैदानात!

क्रिकेट हा जितका रोमांचक खेळ आहे, तितकाच तो धोकादायकही आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 4:43 PM

Open in App

Will Pucovski: क्रिकेट हा जितका रोमांचक खेळ आहे, तितकाच तो धोकादायकही आहे. विशेषतः जेव्हा चेंडू सरळ जाऊन फलंदाजाच्या डोक्याला लागतो, तेव्हा खेळाडूच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोव्स्कीला अशा परिस्थितीचा सर्वाधिक अनुभव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याला आतापर्यंत तब्बल १२ वेळा मैदानात खेळताना चेंडू लागला आहे. नुकताच १२व्यांदा  डोक्याला मार लागला आणि त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. पण अजूनही तो खेळाच्या मैदानात टिकून आहे.

विल पुकोव्स्कीने जानेवारी २०२१ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मात्र, त्यानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी एकही कसोटी खेळला नाही. आता व्हिक्टोरिया सेकंड इलेव्हन विरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात विल पुकोव्स्कीला झालेल्या दुखापतीबाबत अपडेट्स आले. त्यानुसार त्याची दुखापत गंभीर नाही आणि तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो.

सामन्यात फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागल्यानंतर विल पुकोव्स्कीने तत्काळ मैदानाबाहेरचा रस्ता धरला. दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले. चेंडू विल पुकोव्स्कीच्या डोक्याला लागला तेव्हा तो ४२ धावांवर खेळत होता. डेव्हिड ग्रँट नावाच्या गोलंदाजाचा शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न करत असताना विल पुकोव्स्कीच्या डोक्याला चेंडू लागला. चेंडू आदळल्यानंतर पुकोस्कीची प्राथमिक तपासणी झाली. यानंतर, त्याने आणखी ४ चेंडू खेळले पण नंतर ड्रिंक्स ब्रेक झाला आणि नंतर तो मैदानाबाहेर गेला.

विल पुकोव्स्कीला १२ वेळा डोक्याला मार

२५ वर्षीय विल पुकोव्स्कीची कारकिर्दीतील ही १२वी वेळ आहे की तो अशाप्रकारे चेंडू लागण्याचा बळी ठरला. याआधी ११ वेळा त्याच्यासोबत असा प्रकार घडला होता. यापैकी ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करण्यापूर्वी त्याला नऊ वेळा दुखापत झाली होती आणि उर्वरित ३ वेळा त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर दुखापत झाली.

टॅग्स :आॅस्ट्रेलिया