केपटाऊन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांचं भांगडा प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यावेळी दोघांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये रस्त्यावरच भांगडा केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाच जानेवारी पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. केपटाऊनमध्येच उभय संघांमध्येच पहिला कसोटी सामना खेळवण्यात येईल. दरम्यान, घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला शिखर धवन पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबत शंका आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी सामने, 6 वन डे आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारताकडे इतिहास रचण्याची संधी आहे.
भारतविरोधात पाच जानेवारीपासून होणाऱ्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी दक्षिण फ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. फाफ डुप्लेसीस दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या 4 दिवसीय कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्याच दिवशी डावाने विजय मिळवला होता. या सामन्यात दुखापतग्रस्त डुप्लेसीसऐवजी एबी डिव्हीलिअर्सने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी डुप्लेसीस फिट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि क्विंटन टी कॉकला संघात स्थान देण्यात आल्याने भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे.