मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी कोहलीची पत्रकार परिषद झाली आणि त्यात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचाच प्रश्न विचारण्यात आला. कोहलीनं दोन दिवसांपूर्वी धोनीसोबतचा सामन्यादरम्यानचा एक फोटो शेअर केला होता आणि त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं होतं. तो फोटो शेअर करण्यामागचा हेतू आज कोहलीनं सांगितला.
Breaking : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत पत्नी साक्षीनं मौन सोडलं, म्हणाली...
निवड समिती प्रमुखांचे धोनीच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे अपडेट्स
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत माजी कर्णधार धोनी दिसणार नाही. वेस्ट इंडिजपाठोपाठ धोनीनं याही मालिकेतून विश्रांती देण्याची विनंती निवड समितीकडे केली होती आणि ती मान्यही झाली. धोनीची फटकेबाजी या मालिकेत दिसणार नसली तरी कॅप्टन कोहलीनं एक भावनिक फोटो शेअर करून धोनीचे आभार मानले आहे. भारतात 2016मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यातील अखेरच्या क्षणाचा फोटो कोहलीनं इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.''
कोहलीच्या या पोस्टनंतर धोनी निवृत्ती घेतोय अशी चर्चा रंगली. पण, धोनीचा पत्नी साक्षी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद या दोघांनीही ती अफवा असल्याचे स्पष्ट केले. तोच प्रश्न कोहलीला आज विचारण्यात आला. तो म्हणाला,''माझ्या मनात दूरदूर पर्यंत असा विचार नव्हता की धोनी निवृत्ती घेतोय. बस मला त्या सामन्याची आठवण झाली. त्यामुळे मी सहज तो फोटो शेअर केला. पण, लोकांनी त्याचा भलताच अर्थ लावला गेला.''
Web Title: Video : Virat Kohli clarifies on his Insta post; say i never thought about MS dhoni retirement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.