Join us

Video : दिव्यांग मुलाची गोलंदाजी पाहून व्हीव्हीएस लक्ष्मण थक्क; तुम्हीही पडाल प्रेमात

भारताचा दिग्गज फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यानं रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 11:29 IST

Open in App

भारताचा दिग्गज फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यानं रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओत एक दिव्यांग मुलगा नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. ही गोलंदाजी पाहून लक्ष्मण त्या मुलाच्या प्रेमात पडला आहे. हा मुलगा अनेकांना प्रेरणा देणारा आहे असं मत लक्ष्मणनं व्यक्त केलं. त्याच्या शक्तीला लक्ष्मणनं सलाम ठोकला. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिनंही हा व्हिडीओ लाईक्स केला आहे.

लक्ष्मण अनेकदा असे प्रेरणादायी व्हिडीओ पोस्ट करत असतो. त्यानं हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी मुलाचे कौतुक केलं. एका चाहत्यानं तर मुलाल सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नेट्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी द्या, अशी मागणी केली. लक्ष्मणनं मागील महिन्यात रणजी करंडक स्पर्धेतील उपविजेत्या बंगालच्या फलंदाजांसह ऑनलाईन सेशन घेता. त्यानं त्या खेळाडूंना मानसिक तंदुरुस्तीचं महत्त्व सांगितले.  

ईदच्या निमित्तानं इरफान पठाणनं देशवासियांना दिल्या अशा शुभेच्छा, पाहा Video 

क्रीडा विश्वात हळहळ! तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारे बलबीर सिंग यांचे निधन

 

टॅग्स :सोशल व्हायरल