भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन बिग बॅश लीगच्या १०व्या पर्वात खेळण्यासाठी दाखल झाला आहे. BBL 10मध्ये तो ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. शुक्रवारी ब्रिस्बेन हिट व अॅडलेड स्ट्रायकर यांच्यात सामना झाला आणि त्यात लाबुशेननं विकेटही घेतल्या. बेन लॉफलीन ( Ben Laughlin) यानं अफलातून झेल घेताना लाबुशेनला हे यश मिळवून दिलं. स्ट्रायकरच्या डावातील १८व्या षटकात मिचेल नेसेर यानं उत्तुंग फटका मारला, परंतु लॉफलीननं अविश्वसनीय झेल घेतला.
या झेलपूर्वी लॉफलीननं काही मिसफिल्ड केली होती. त्यामुळे हा कॅच त्याला टीपता येईल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, लॉफलीननं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लाबुशेनही अवाक् झाला, परंतु त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. एलिमिनेटर सामन्यात ट्रॅव्हीस हेडच्या स्ट्रायकर संघाला ७ बाद १३० धावा करता आला. लाबुशेनननं १३ धावांत ३, तर मिचेल स्वेप्सननं २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. ब्रिस्बेननं हा सामना सहा विकेट राखून जिंकला. जिमि पिरसनच्या ४७ आमि डेन्लीच्या ४१ धावांच्या जोरावर ब्रिस्बेननं हा सामना जिंकला.
पाहा व्हिडीओ..