कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 5 लाख 97, 267 इतकी झाली आहे. त्यापैकी 1लाख 33,363 इतकी झाली असून मृतांचा आकडा 27,365 इतका झाला आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. घरात बसलेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनं प्रेरणादायी गाणं आणलं आहे. विंडीजचा हा क्रिकेटपटू DJ Bravo म्हणूनही ओळखला जातो. यापूर्वी ब्राव्होनं अनेक गाणी गायली आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यानं आणलेलं नवं गाणं मनोबल उंचावणारे ठरत आहे. ब्राव्होच्या या गाण्याचा आशय 'We are not giving up' म्हणजेच आम्ही हार मानणार नाही, असा आहे.
या गाण्यातून ब्राव्होनं लोकांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरसशी यशस्वी लढा दिला जाऊ शकतो, फक्त योग्य ती काळजी घ्या, असा सल्लाही त्यानं दिला आहे. ''कोरोना व्हायरससमोर आम्ही शरणागती पत्करणार नाही. तुम्हा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. सर्वांनी एकत्र येऊन या व्हायरसचा मुकाबला करूया,'' असे ब्राव्होनं सांगितलं.
पाहा व्हिडीओ...
ब्राव्होनं गतवर्षी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, त्यानं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्याला यंदा होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचे वेध लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी