Join us

Video : युवराज सिंग Right-handed असता तर? स्टुअर्ट ब्रॉडची अशी धुलाई झाली असती

युवीनं त्या सामन्यात 16 चेंडूंत 58 धावा चोपल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:05 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची केलेली धुलाई, आजची सर्वांच्या चांगली लक्षात आहे. युवीनं इंग्लंडच्या गोलंदाजाच्या एका षटकात सहा षटकार खेचून इतिहास घडवला होता. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज होता. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफनं युवीला डिवचले अन् त्यानंतर भारतीय फलंदाजानं सर्व राग ब्रॉडवर काढला. पण, युवी जर लेफ्टी नसून राईटी असता तर ब्रॉडची कशी धुलाई झाली असती? पाहूया भन्नाट व्हिडीओ...

अभिमानास्पद ; शूजवर हातानं लिहायची Adidas; आता तोच ब्रँड Hima Dasसाठी बनवतो 'खास' शूज!

युवीनं त्या सामन्यात 16 चेंडूंत 58 धावा चोपल्या होत्या. त्यानं 12 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. गौतम गंभीर ( 58) आणि वीरेंद्र सेहवाग ( 68) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 4 बाद 218 धावा उभ्या केल्या. युवीनं या सामन्यात ट्वेंटी-20तील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी यांनीही 12 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. भारतानं हा सामना 148 धावांनी जिंकला होता.  

युवीच्या एका चाहत्यानं व्हिडीओ तयार केला आहे. त्यात युवी राईट हँडनं जोरदार फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ब्रॉड डाव्या हातानं गोलंदाजी करत आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...

KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य

युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!

फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू मागतोय माफी; म्हणतो दुसरी संधी द्या...

आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो!; 'कॉफी विथ करण' वादावर Hardik Pandya म्हणतो...

डेव्हिड वॉर्नरची 'बनवाबनवी'; पत्नीचा स्वीम सूट घालून TikTok Video 

टॅग्स :युवराज सिंगस्टुअर्ट ब्रॉड