Join us

VIDEO : जेव्हा सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकतो ख्रिस गेल  

स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला तुम्ही कधी हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या गाण्यांवर थिरकताना बघितले आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 16:00 IST

Open in App

नवी दिल्ली - विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला तुम्ही कधी हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या गाण्यांवर थिरकताना बघितले आहे का? जर नाही, तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओत गेल चक्क सपनाच्या गाण्यावर ठेका धरताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ सपना चौधरीने आपल्या इनस्टाग्रामवर  शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ख्रिस गेल सपना चौधरीच्या 'तेरी आंख्या का यो काजल' या गाण्यावर थिरकता दिसतोय. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ क्रोमा स्टूडिओमध्ये शूट केल्याचे दिसत आहे. असा अंदाज बांधला जातोय की गेलवर गाणे चित्रित केलं आहे. लवकरच गेलच्या चाहत्यासमोर येण्याची शक्यता आहे. सध्या भारतात आयपीएलचा 'रन'संग्राम सुरु आहे. पंजाबकडून खेळत असून त्याने आयपीएलमध्ये त्याने यंदाचे पहिले शतक झळकावले आहे. 

टॅग्स :आयपीएल 2018