कॅनडा- आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पहिल्यांदाच मैदानात उतरणार होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा कॅनडा टी- 20 लीगमधील युवराजच्या खेळीवर होत्या. परंतू त्याने पहिल्या सामन्यातच चाहत्यांना निराश केले. त्याने 27 चेंडूत केवळ 14 धावा केल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असल्याचे सोशल मीडियावर दिसून आले. पण हा सामना जास्त चर्चिला गेला कारण बाद नसतानाही युवराजने मैदान सोडले होते.
त्या सामन्यात झाले असे की, 16 व्या षटकात रिझवान चिमाच्या गोलंदाजीवर युवराज स्टंम्पिंग झाला पण तो आउट नव्हता, परंतु पंच निर्णय देण्याआधीच त्याने मैदान सोडले होते.
पाहा व्हिडिओ:
कॅनडा टी- 20 लीगची सुरुवात गुरुवारपासून झाली. या लीगचा पहिला सामना युवराजच्या टोरोंटो नॅशनल संघ विरुद्ध ख्रिस गेलच्या व्हँकोव्हर नाइट्स यांच्यात रंगला होता. टोरोंटो नॅशनलने क्लासेन व पोलार्डच्या ताबडतोड खेळीच्या जोरावर 159 धावांपर्यत मजल मारु शकले. त्यानंतर व्हँकोव्हर नाइट्सकडून व्हॅालटोन व व्हॅन डेर ड्यूसेनच्या अर्धशतकी खेळीमुळे हा सामना गेलच्या व्हँकोव्हर नाइट्सने 8 विकेट्स राखून सहज विजय मिळविला.