वर्ल्ड कप आणि भारताविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतरही वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं जेसन होल्डरकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली. त्यांनी किरॉन पोलार्डकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. पोलार्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2014नंतर वेस्ट इंडिजनं पहिलीच वन डे मालिका जिंकली. विंडीजनं तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली.
पण,या सामन्यात एक अशी घटना घडली की पोलार्ड नेटिझन्सच्या रडारवर आला. लखनौ येथे खेळवण्यात आलेल्या या मालिकेत पोलार्डनं अखेरच्या सामन्यात अंपायरला चक्क निर्णय बदलण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची अवस्था 24 षटकांत 4 बाद 97 अशी केली होती. त्यानंतर कर्णधार पोलार्ड गोलंदाजीला आला.
32 वर्षीय पोलार्डनं पहिलाच चेंडू नो बॉल होता. पण, पंचांचा निर्णय एकताच त्यानं चेंडू फेकला नाही. त्यामुळे पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि डेड बॉल जाहीर करण्यात आला. पोलार्डनं असा डाव करून संघाचा एक फ्री हिट वाचवला.
पाहा व्हिडीओ...